इस्रोच्या महिला शास्त्रज्ञ एन्. वलरमथी यांचे निधन

‘चंद्रयान-३’चे केले होते ‘काऊंटडाऊन’ !

(येथे काऊंटडाऊन म्हणजे यानाच्या प्रक्षेपणच्या शेवटच्या १० सेकंदाची करण्यात येणारी उलटगणती)

इस्रोच्या महिला शास्त्रज्ञ एन्. वलरमथी

श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) – ‘चंद्रयान-३’च्या प्रक्षेपणापूर्वी ‘काऊंटडाऊन’ करणार्‍या ‘इस्रो’च्या महिला शास्त्रज्ञ एन्. वलरमथी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ३ सप्टेंबरच्या रात्री निधन झाले. त्या ६४ वर्षांच्या होत्या. ‘इस्रो’च्या अनेक प्रकल्पांच्या प्रक्षेपणाचे ‘काऊंटडाऊन’ एन्. वलरमथी यांनी केले होते.  ‘इस्रो’चे माजी संचालक डॉ. पी.व्ही. वेंकीटाकृष्णन् यांनी ट्वीट करून त्यांच्या वलरमथी यांच्या निधनाची माहिती दिली.