पुणे येथील अग्नीशमन दलाच्या कात्रज स्थानकातील कर्तव्यावरील अधिकारी सक्तीच्या रजेवर ! – मंत्री उदय सामंत

विधान परिषद प्रश्नोत्तरे…

मंत्री उदय सामंत

मुंबई, २६ जुलै (वार्ता.) – पुणे येथील अग्नीशमन दलाच्या कात्रज स्थानकातील कर्तव्यावरील अधिकारी यांची चौकशी होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी २६ जुलै या दिवशी विधान परिषदेत दिली. याविषयीचा तारांकित प्रश्न सदस्य गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला होता.

मंत्री सामंत म्हणाले की, पुणे येथील अग्नीशमन दलाच्या कात्रज स्थानक कर्तव्यावरील अधिकारी यांच्याविषयी तक्रारींची शासनस्तरावर गंभीर नोंद घेऊन संचालक, महाराष्ट्र अग्नीशमन सेवा यांच्या वतीने चौकशी करण्यात येऊन दोषी आढळल्यास संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करण्यात येईल. या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य सचिन अहिर यांनी सहभाग घेतला.