छतरपूर (मध्यप्रदेश) येथील मंदिराला भजन आणि आरती यांमुळे होणार्‍या कथित ध्वनीप्रदूषणावरून दिलेली नोटीस प्रशासनाने लगेचच घेतली मागे !

मंदिराजवळ सरकारी अधिकार्‍यांचे बंगले असल्याने नोटीस दिल्याचा लोकांचा आरो

छतरपूर (मध्यप्रदेश) – येथील नरसिंह मंदिराच्या पुजार्‍यांना विभागीय अधिकार्‍यांनी भजन आणि आरती यांमुळे ध्वनीप्रदूषण होत असल्यावरून नोटीस बजावली होती; मात्र काही वेळाने ती नोटीस मागे घेण्यात आली. नोटीस मागे घेण्यापूर्वी सामाजिक माध्यमांतून ती प्रसारित झाल्यानंतर धर्माभिमानी हिंदूंकडून त्यावर टीका चालू झाली होती. लोकांचे म्हणणे आहे की, या मंदिराच्या जवळच जिल्हा पंचयतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांचे बंगले आहेत. त्यांना आरतीच्या आवाजाचा त्रास होत असल्यानेच ही नोटीस बजावण्यात आली होती. पुढे यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता लक्षात येताच नंतर ती नोटीस मागे घेण्यात आली.

या प्रकरणी विभागीय अधिकारी बालवीर रमण यांनी सांगितले की, आम्हाला तोंडी तक्रार आल्यानंतर लेखी नोटीस बजावली होती. आता आरतीचा आवाज हळू करण्यात आल्याने नोटीस मागे घेण्यात आली. (एरव्ही जनतेला कोणत्याही गोष्टीसाठी लेखी तक्रार करण्यास सांगणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांनी आतापर्यंत किती तोंडी तक्रारींवर तात्काळ कारवाई केली आहे ?, हेही त्यांनी सांगितले पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

  • कथित ध्वनीप्रदूषणावरून मंदिराला नोटीस बजावणारे प्रशासन कधी मशिदींवरील भोंग्यांमुळे दिवसांतून ५ वेळा होणार्‍या ध्वनीप्रदूषणासाठी नोटीस बजावते का ?
  • भाजपच्या राज्यात प्रशासनाकडून होणारी अशा कृती हिंदूंना अपेक्षित नाही !