नवी देहली – ‘अणूबाँबचे पिता’ म्हणून प्रसिद्ध असलेले रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘ओपेनहायमर’मध्ये हिंदूंचा पवित्र धर्मग्रंथ भगवद्गीतेचा अवमान करण्यात आला आहे. यामध्ये ओपेनहायमर यांची भूमिका केलेले कलाकार सिलियन मर्फी आणि प्रेयसी जीन टैटलॉक यांची भूमिका करणार्या फ्लोरेन्स पुघ यांच्यातील अश्लील दृश्याच्या वेळी भगवद्गीताही दिसत आहे. यामुळे संतप्त हिंदू याचा निषेध नोंदवत आहेत.
#Oppenheimer चित्रपटात सेक्स दृश्यादरम्यान ओपेनहायमर ‘भगवद-गीता’ वाचत आहे असे दाखवले आहे!
सर्वजण हिंदूंच्या संयमाची परीक्षा घेत आहेत! गीतेचे योगदान दर्शविण्यासाठी 100 मार्ग होते, 100 मार्गांनी ‘गीता’चा गौरव करता आला असता!#Hindu #BhagwatGita #भगवत_गीता pic.twitter.com/GM7MjvJ0m4— 🇮🇳🚩 Shreyas (@Punekar_SK) July 22, 2023
१. यासंदर्भात काही लोकांचे म्हणणे आहे की, हा चित्रपट भारतात दाखवण्यासाठी संबंधित अश्लील दृश्य पुसट केले गेले असतांनाही त्यामध्ये भगवद्गीता स्पष्ट कशी काय दाखवण्यात आली आहे ? काही लोक म्हणत आहेत की, ओपेनहायमर यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटामध्ये हे दृश्य दाखवणेच मुळात अनावश्यक होते.
२. ओपेनहायमर यांच्या जीवनामध्ये भगवद्गीतेचे अनन्यसाधारण महत्त्व होते. ओपेनहायमर यांनी जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणूबाँब फेकल्यानंतर त्यांना पश्चात्ताप झाला होता. तेव्हा त्यांनी भगवद्गीतेचे वाचन केल्यानंतर त्यांचे मन शांत झाले होते.
संपादकीय भूमिका
|