‘गुरु-शिष्या’च्या पदकासंबंधी सेवा करतांना मी ३ रेखाचित्रे काढून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दाखवली. त्या वेळी त्यांनी माझ्याकडून अभ्यास करून घेतला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार कलाकृतीमध्ये पालट करतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. रेखाचित्रे
१ अ. आकृती १ : या कलाकृतीमध्ये गुरूंना दाढी दाखवली नाही. (पदकाचा आकार लहान असल्याने गुरूंच्या चेहर्याचा आकार नीट कळावा, या दृष्टीने दाढी दाखवलेली नाही.)
१ आ. आकृती २ : या कलाकृतीमध्ये गुरूंना दाढी दाखवली आहे.
१ इ. आकृती ३ : ही अंतिम कलाकृती आहे.
२. ‘दाढी ठेवणे’, हे जरी असात्त्विक असले, तरी हा नियम सर्वसामान्य व्यक्तींसाठी असणे; मात्र गुरु किंवा संत यांना हा नियम लागू नसणे; कारण त्यांच्यासाठी ‘दाढी ठेवणे’ हे चैतन्य प्रक्षेपित होण्याचे माध्यम आहे’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे
प.पू. डॉक्टरांनी मला ‘आकृती १’ आणि ‘आकृती २’ यांपैकी कोणत्या आकृतीकडे पाहून चांगले वाटते ?’, हे पहाण्यास सांगितले. त्या वेळी मला ‘आकृती १’ पेक्षा ‘आकृती २’ कडे पाहून चांगले वाटले. तेव्हा मला वाटले, ‘दाढी ठेवणे, हे जरी असात्त्विक असले, तरी आकृती २ कडे पाहून चांगले का वाटते ?’ त्या वेळी प.पू. डॉक्टरांनी त्यामागचे शास्त्र सांगितले. ते म्हणाले, ‘‘दाढी ठेवणे’, हे जरी असात्त्विक असले, तरी हा नियम सर्वसामान्य व्यक्तींसाठी आहे. गुरु किंवा संत यांना हा नियम लागू नाही; कारण त्यांच्यासाठी ते चैतन्य प्रक्षेपित होण्याचे माध्यम आहे.’’
३. ‘आकृती २’ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी करायला सांगितलेला पालट
प.पू. डॉक्टरांनी शिष्याचा आकार लहान करण्यास सांगितले. त्यांनी सांगितले, ‘‘गुरूंपेक्षा शिष्य मोठा दिसायला नको.’’
४. साधिकेने कलाकृती चांगली होण्यासाठी बुद्धीच्या स्तरावर कलाकृतीमध्ये अनेक पालट करूनही तिला समाधान न वाटणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे कलाकृतीत पालट केल्यावर साधिकेला चांगले वाटणे अन् शरणागतभाव जाणवणेे
याआधी मी कलाकृती चांगली होण्यासाठी बुद्धीच्या स्तरावर कलाकृतीमध्ये अनेक पालट करूनही मला समाधान वाटत नव्हते. मला वाटत होते, ‘त्यात काहीतरी राहिले आहे.’ प.पू. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे शिष्याचा आकार लहान केल्यावर कलाकृतीकडे पाहून मला चांगले वाटू लागले. प.पू. डॉक्टरांच्या ‘गुरूंपेक्षा शिष्य मोठा दिसायला नको’, या वाक्याचे मला स्मरण झाले. ‘आपल्या जीवनात गुरूंपेक्षा मोठे काहीच नाही’, याची मला जाणीव होऊन माझी भावजागृती झाली. ‘आता ही कलाकृती खर्या अर्थाने परिपूर्ण झाली’, असे मला वाटले, तसेच त्याकडे पाहून मला समाधान वाटत होते. कलाकृतीकडे पाहून मला शरणागतभाव जाणवत होता.
५. कलाकृतीत पालट करून ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दाखवल्यावर ते म्हणाले, ‘‘आता चांगले झाले !’’ तेव्हा ‘कलाकृतीच्या माध्यमातून गुरु आपल्यातील न्यूनता दूर करून आपल्याला घडवतात’, हे मला शिकायला मिळाले.
६. महान गुरूंच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता
कलेसंबंधी ज्ञान देणारे अनेक आहेत; परंतु प.पू. डॉक्टर आम्हा कलेशी संबंधित सेवा करणार्या साधकांना कलेसंबंधी ज्ञानासह अध्यात्मातील विविध पैलूही शिकवतात. आमचे अज्ञान दूर करणारे आणि कलेच्या माध्यमातून साधना शिकवणारे, असे ते एकमेवाद्वितीय गुरु आहेत. या अनमोल मार्गदर्शनासाठी आम्ही त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– कु. सिद्धि महेंद्र क्षत्रीय (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ३४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.४.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |