वडवली (तालुका वाडा) येथे ३२ गोवंशियांना दाटीवाटीने कोंबल्‍याप्रकरणी ६ जणांवर गुन्‍हा नोंद !

चौघे जण कह्यात

( प्रतिकात्मक छायाचित्र )

वाडा (जिल्‍हा ठाणे) – वाडा तालुक्‍यातील वडवली येथील माध्‍यमिक शाळेजवळील एका चाळीत अवैधरित्‍या दाटीवाटीने कोंडून ठेवलेल्‍या ३२ गोवंशियांची सुटका वाडा पोलिसांनी स्‍थानिक कार्यकर्त्‍यांच्‍या साहाय्‍याने केली. या गोवंशियांमध्‍ये गायी, बैल आणि वासरे यांचा समावेश होता. त्‍यांच्‍यासाठी चारा-पाण्‍याचीही व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली नव्‍हती. या प्रकरणी एकूण ६ जणांवर गुन्‍हा नोंदवण्‍यात आला असून चौघांना कह्यात घेतले आहे.

संपादकीय भूमिका

गोवंशहत्‍या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही होत नसल्‍याचाच हा परिणाम !