पहिल्‍या पावसात भिजणे टाळावे

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २०५

‘काही जण पाऊस पडायला लागल्‍यावर मुद्दामहून पहिल्‍या पावसात भिजतात. असे करणे चुकीचे आहे. आजकाल वायूप्रदूषणामुळे पावसाच्‍या पाण्‍यात अनेक प्रदूषित घटक मिसळलेले असण्‍याची शक्‍यता असते. या प्रदूषित घटकांचा त्‍वचेवर अनिष्‍ट परिणाम होऊ शकतो. त्‍यामुळे पहिल्‍या पावसात भिजणे टाळायला हवे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.५.२०२३)

लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्‍यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan