१४ जणांवर गुन्हा नोंद, ६ जणांना कह्यात !
हिंगोली – वाशिम येथून कत्तलीसाठी घेऊन जाणार्या १४ बैलांसह २५.८१ लाख रुपयांचा माल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १८ जून या दिवशी जप्त केला आहे. या प्रकरणी १४ जणांवर हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून ६ जणांना कह्यात घेतले आहे.
वाशिम येथून ३ पिकअप वाहनांमध्ये काही जनावरे भरून हिंगोलीकडे आणली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ३ पिकअप् वाहने थांबवून चालकांची चौकशी चालू केली. वाहनांची पडताळणी केली असता यामध्ये १४ बैल आढळून आले. पोलिसांच्या चौकशीमध्ये वाहनचालकांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी पिकअप् वाहनासह १४ बैल कह्यात घेऊन हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात आणले आहेत.
पोलिसांनी भ्रमणभाष आणि पिकअप असा २५.८१ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी शिवसाम घेवारी यांच्या तक्रारीवरून किशोर माने, शेख रफिक शेख रजाक, अरबाज खान वलायद खान, अजीज हुसेन जानीवाले, हुसेन चंदू रायलीवाल, शेख मुजीब, शेख अब्बास शेख अनवर, शेख अनवर शेख अहमद, शेख फैजान शेख रशीद, शेख जानी, शेख अली, शेख ताजू, रहीम रायलीवाले आणि अब्दुल वहिद अब्दुल सईद यांच्यावर गुन्हा नोंद केला. पोलिसांनी ६ जणांना चौकशीसाठी कह्यात घेतले आहे.\
संपादकीय भूमिकाआणखी किती कत्तलीच्या घटना घडल्यावर गोवंशहत्या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही होणार आहे ? |