नाशिक जिल्हा बँक कर्ज घोटाळा प्रकरण
नाशिक – नाशिक जिल्हा बँकेच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी माजी संचालक गणपतराव पाटील यांच्याकडून एका वृत्तवाहिनीच्या संचालकाने ६० सहस्र रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार प्रविष्ट झाल्यानंतर वृत्तवाहिनीचा संचालक कल्पेश लचके याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. पाटील यांच्या ४ साथीदारांनाही २० सहस्र रुपये द्यावे लागतील, असा धाक दाखवला होता.
बातमी न करण्यासाठी मागितली लाच !
कल्पेश लचके आणि त्याचे वडील स्थानिक वृत्तवाहिनी चालवतात. लचके याने गणपतराव पाटील यांना दूरभाष करत ‘तुमची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आली आहे. तुम्ही मला भेटा’, असे सांगितले. लचके याने ‘तुम्ही जिल्हा बँकेतून कर्ज घेतले होते. ते परत करतांना घोटाळा केला. याची बातमी होऊ द्यायची नसेल, तर ८० सहस्र रुपये द्यावे लागतील’, असे सांगितले. त्यानंतर अशी कोणतीही तक्रार प्राप्त नाही अशी माहिती समजली. त्यामुळे पाटील यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.