‘दळणवळण बंदीच्या काळात साधकांनी निराश न होता साधना करावी’, या तळमळीमुळे सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा यांनी कर्नाटक राज्यातील साधकांचा घेतलेला ‘ऑनलाईन’ भाववृद्धी सत्संग अन् या सत्संगाचा साधकांना झालेला अपूर्व लाभ ! 

‘वर्ष २०२१ मध्ये कोरोनामुळे दळणवळण बंदी लागू करण्यात आली होती. दळणवळण बंदी चालू झाल्यानंतर साधक समष्टी सेवा करण्यासाठी घराबाहेर जात नव्हते. काही साधक वयस्कर होते. त्यांना बाहेर जाऊन सेवा करण्याची भीतीही वाटत होती. ‘या आपत्काळात सर्व साधकांची साधना वेगाने व्हावी’, यासाठी पू. रमानंदअण्णांनी (पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे संत, वय ४७ वर्षे) यांनी) कर्नाटकातील सर्व साधकांसाठी ‘ऑनलाईन’ भाववृद्धी सत्संग घेतला. हा सत्संग २८.२.२०२१ ते १५.३.२०२१ या कालावधीत प्रतिदिन सकाळी ७.३० ते ८ या वेळेत होत होता. साक्षात् संतवाणीतून होणार्‍या या सत्संगाचा लाभ ७०० हून अधिक साधकांनी घेतला. पू. रमानंदअण्णांनी घेतलेल्या भाववृद्धी सत्संगामुळे साधकांमध्ये झालेले पालट अन् त्यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. 

५.६.२०२३ या दिवशी या अनुभूतींचा काही भाग पाहिला. आता उर्वरित भाग पाहूया.

(भाग २) 

या लेखाचा आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/689066.html
पू. रमानंद गौडा

२. पू. रमानंद गौडा यांनी घेतलेल्या भाववृद्धी सत्संगामुळे साधकांमध्ये झालेले पालट

२ उ. सौ. कृष्णवेणी, रायचूर

सौ. मंजुळा रमानंद गौडा

१. ‘पू. अण्णांच्या सत्संगामुळे माझी अंतर्मुखता वाढून माझे स्वभावदोष आणि अहं यांविषयीचे निरीक्षण वाढू लागले.’

२. ‘पू. अण्णा सत्संग घेत असतांना प्रतिदिन मला चैतन्य मिळत असल्याचे जाणवले.’

३. पू. रमानंद गौडा यांनी घेतलेल्या ‘ऑनलाईन’ भाववृद्धी सत्संगामुळे साधकांना आलेल्या अनुभूती

३ अ. सौ. विदुला हळदीपूर, हुबळ्ळी

१. ‘प्रतिदिन ‘ऑनलाईन’ भाववृद्धी सत्संग झाल्यानंतर दिवसातून ३ – ४ वेळा साक्षात् गुरुदेव घरी आले आहेत’, अशी अनुभूती मला येत होती. मला संपूर्ण दिवस भावस्थितीत रहाता येत होते.’

३ आ. सौ. भावना नेत्रेकर, उत्तर कन्नड

३ आ १. साधिकेच्या यजमानांनी सत्संग ऐकल्यावर त्यांना सुगंधाची अनुभूती येणे आणि ते साधनेविषयी सकारात्मक होणे : ‘माझे यजमान प्रतिदिन सकाळी ७.३० वाजता कामावर जात होते. त्या आधी मला त्यांच्यासाठी जेवणाचा डबा करून द्यावा लागत होता. मी एकीकडे भाववृद्धी सत्संग ऐकत स्वयंपाक करत होते. आरंभी त्यांना कामावर जाण्याची गडबड असायची; पण नंतर त्यांना ‘सत्संग ऐकायला हवा’, असे वाटू लागले. त्यांनी मला सत्संग ध्वनीमुद्रित करायला सांगितला आणि नंतर तो ऐकला. त्यानंतर त्यांना ३ – ४ वेळा सुगंधाची अनुभूती आली. त्यामुळे ते साधनेविषयी सकारात्मक झाले.’

३ इ. श्री. श्रीकांत देशपांडे, बेळगाव

३ इ १. महाशिवरात्रीच्या दिवशी वेळ अत्यल्प असूनही सर्व सेवा वेळेत पूर्ण होणे आणि ‘संतांचा संकल्प कसा कार्यरत होतो ?’, हे अनुभवता येऊन पू. अण्णांविषयी कृतज्ञता वाटणे : ‘भाववृद्धी सत्संग ऐकल्यावर ‘सतत भावावस्थेत रहावे’, असे मला वाटायचे. ‘माझा उत्साह वाढला आहे’, असे मला वाटायचे. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी सेवा करतांना ‘वेळ अत्यल्प आहे. त्यामुळे सर्व सेवा पूर्ण कशा करायच्या ?’, असे मला वाटत होते; परंतु साधकांचा उत्साह आणि भाव पाहून ‘सर्व सेवा कधी पूर्ण झाल्या ?’, हे मला समजलेच नाही. सेवा करत असतांना मला साधकांकडून साहाय्य मिळाले आिण समाजाकडून चांगला प्रतिसाद मिळाला. हे सर्व पाहून ‘संतांचा संकल्प सर्व कसे करून घेतो ?’ आणि ‘आपण केवळ माध्यम होऊन त्याचा आनंद कसा घ्यायचा ?’, याची अनुभूती मला आली’, त्याबद्दल मला पू. अण्णांविषयी कृतज्ञता वाटली.’

३ ई. सौ. महानंदा होद्लुर, विजयपूर 

१. ‘सत्संगाच्या वेळी प्रतिदिन घरी सण असल्यासारखे वातावरण असायचे.’

३ उ. सौ. शोभा आचार्य, मंगळुरू 

३ उ १. प्रारंभी कुटुंबियांच्या नकळत सत्संग ऐकणे, नंतर ‘स्पीकर’वर सत्संग लावतांना भीती वाटल्यावर गुरुदेवांनी सूक्ष्मातून ‘मी तुझ्या समवेत आहे, घाबरू नकोस’, असे सांगणे आणि कुटुंबियांनी विरोध न केल्यामुळे भावजागृती होणे : ‘पहिल्या दिवशी मी पू. अण्णांचा सत्संग कुटुंबियांच्या नकळत ऐकला. सत्संग प्रतिदिन असल्याने ‘उद्या तो कसा ऐकायचा ?’, याविषयी माझ्या मनात पुष्कळ संघर्ष होत होता. दुसर्‍या दिवसापासून गुरुदेवांना अत्यंत शरणागतीने प्रार्थना करून मी ‘स्पीकर’वर (ध्वनीप्रक्षेपक यंत्रावर) सत्संग ऐकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा घरचे काही बोलले नाहीत. दुसर्‍या दिवशी साधक अनुभूती सांगत असतांना ‘स्पीकर’ लावतांना मला भीती वाटल्यावर सूक्ष्मातून गुरुदेव मला म्हणाले, ‘तू का घाबरतेस ? मी तुझ्या समवेत आहे. घाबरू नकोस. काही होणार नाही.’ तेव्हा ‘पू. अण्णांचे ‘आपले शरीर गुरुदेवांचेच आहे’, असा भाव ठेवूया’, हे वाक्य मला आठवले. नंतर मी ‘स्पीकर’चा आवाज वाढवला. कुटुंबीय तिथे असूनही काहीच म्हणाले नाहीत. हा त्यांच्यात झालेला मोठा पालट आहे. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटून माझी भावजागृती झाली. हे केवळ गुरुकृपा आणि पू. अण्णांची चैतन्यमय वाणी यांमुळेच मला अनुभवता आले.’

३ ऊ. सौ. नीला, सागर, शिवमोग्गा.

३ ऊ १. सत्संगामुळे वातावरणाची शुद्धी झाल्याचे जाणवून घरात सर्वत्र सुगंध येणे आणि त्यामुळे कुटुंबियांचीही भावजागृती होणे : ‘पू. अण्णांच्या सत्संगामुळे घराची शुद्धी होत आहे’, असे मला वाटले. ‘दिवसभर साक्षात् भगवंतच आमच्या घरी आहे’, असे वाटून माझी भावजागृती होत होती. शेवटच्या दिवशी सत्संगामुळे घरचे वातावरण पुष्कळ सात्त्विक झाले होते. त्या दिवशी घराच्या सभोवती पक्षांची किलबिल ऐकू येत होती. नंतर घरात सुगंध दरवळत होता. माझी आई आणि सासूबाई यांना घरी आल्यावर सुगंध आला. तेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘‘केवळ गुरुवाणीमुळे वातावरणाची शुद्धी झाली आहे.’’ तेव्हा त्यांचीही भावजागृती झाली.’

३ ए. सौ. रेवती हरगी, सागर, शिवमोग्गा.

३ ए १. कुटुंबियांची क्षमायाचना करतांना आरंभी संघर्ष होणे, गुरुदेवांना प्रार्थना करून क्षमायाचना केल्यावर हलके वाटणे आणि नंतर कुटुंबियांनीही क्षमायाचना केल्यावर घरातील वातावरण पालटणे : ‘सत्संगाच्या वेळी सकाळी आमच्या घरात उत्सवाचे वातावरण निर्माण होते. ‘मी घरातील लोकांची क्षमायाचना केल्यास घरातील लोक माझी चेष्टा करतील’, या विचाराने क्षमायाचना करण्यासाठी माझा पुष्कळ संघर्ष होत होता. तेव्हा मी गुरुदेवांना शरण जाऊन ‘मला शक्ती द्या’, अशी प्रार्थना केली आणि घरातील लोकांसमोर माझ्याकडून झालेल्या चुका सांगून त्यांची क्षमायाचना केली. तेव्हा माझे मन पुष्कळ हलके झाले. नंतर मुले आणि नातवंडे यांनीही क्षमायाचना केली. त्या वेळी ‘घरातील वातावरण पालटले’, असे मला जाणवले.’

३ ऐ. श्री. काशीनाथ प्रभु (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), भटकळ, उत्तर कन्नड.

३ ऐ १. ‘पू. अण्णा साधकांकडून गुरुदेवांच्या पादुकांची मानसपूजा करून घेत असतांना पुष्कळ भावजागृती होणे, तेव्हा गुरुदेवांनी ‘मीच पू. अण्णा आहे’, असे सांगणे आणि पू. अण्णा अन् परात्पर गुरुदेव हे दोघे एकच असल्याची अनुभूती येणे : ‘एकदा पू. अण्णा साधकांकडून गुरुदेवांच्या पादुकांची मानसपूजा करून घेत होते. तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती होत होती. थोड्या वेळाने माझे ध्यान लागले. त्यानंतर मी सहज स्थितीत आलो. तेव्हा माझा आतून ‘पू. अण्णा, पू. अण्णा’, असा नामजप होत होता. मी डोळे बंद करून देवाला विचारले, ‘माझ्याकडून हा नामजप का होत आहे ?’ तेव्हा आतून गुरुदेवांचा आवाज आला. ते म्हणाले, ‘मीच पू. अण्णा आहे. मीच त्यांच्या माध्यमातून कार्यरत आहे. तुम्ही याचा अनुभव घेत आहात.’’ तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती होऊन मला कृतज्ञता वाटली.’

४. अहंचा लवलेशही नसणारे पू. रमानंदअण्णा !

‘या सत्संगामुळे साधकांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेची फलनिष्पत्ती वाढली. सर्व साधकांचे प्रयत्न वाढले. असे असूनही पू. अण्णांच्या मनात कर्तेपणाचा लवलेशही नव्हता. ‘हे सर्व गुरुदेवांच्या कृपेमुळे झाले आणि त्यांनीच सर्व करवून घेतले’, या भावाने त्यांनी ते सारे श्रेय श्री गुरुचरणी अर्पण केले. त्या वेळी त्यांच्या बोलण्यातूनही केवळ कृतज्ञताभाव व्यक्त होत होता.

‘आम्हा सर्व साधकांची साधना चांगली व्हावी आणि साधकांना याच जन्मी श्री गुरुचरणांची प्राप्ती व्हावी’, यासाठी पू. रमानंदअण्णा यांनी सत्संग घेतले. त्यांच्याप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. ‘अशी संतविभूती श्री गुरुकृपेमुळे आम्हाला मिळाली’, याबद्दल मी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

(समाप्त)

– सौ. मंजुळा गौडा (पू. रमानंद गौडा यांच्या पत्नी, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), मंगळुरू, कर्नाटक. (१६.८.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक