रसायनयुक्‍त सांडपाण्‍यातच आळंदी येथे वारकर्‍यांना करावे लागणार तीर्थस्नान !

आळंदी देवस्‍थान

आळंदी (जिल्‍हा पुणे) – आषाढी वारी अवघ्‍या १० दिवसांवर येऊन ठेपली आहे; मात्र येथील इंद्रायणी प्रदूषणाचा प्रश्‍न गेली काही वर्षे वाढतच चालला आहे. हे वेळीच थांबवले नाही, तर अशा रसायनयुक्‍त सांडपाण्‍यातच वारकर्‍यांना येत्‍या आषाढी वारीत तीर्थस्नान आणि आचमन करावे लागणार आहे. पालकमंत्री, महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, जिल्‍हा प्रशासन, आळंदी देहू देवस्‍थान आणि वारकर्‍यांच्‍या वारीतील नियोजनाच्‍या बैठकाही झाल्‍या; मात्र इंद्रायणी नदीत सांडपाणी सोडण्‍याचे प्रमाण बंद होण्‍याऐवजी अधिक वाढले आहे. त्‍यामुळे या बैठका ‘फार्स’ होत्‍या का ? असा प्रश्‍न वारकर्‍यांना इंद्रायणीचे काळवंडलेले पाणी पाहून पडत आहे.

शहरातील सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. त्‍यामुळे नदीच्‍या पाण्‍यावर काळपट तवंग आणि फेस आला आहे, तसेच जलपर्णीही बेसुमार वाढली आहे. ४ आठवड्यांपूर्वी इंद्रायणी सेवा फाऊंडेशनच्‍या कार्यकर्त्‍यांनी उपोषण केले. त्‍या वेळी प्रांताधिकार्‍यांनी उपाययोजनांविषयी आश्‍वासन दिले; मात्र पुढे काहीच झाले नाही.

संपादकीय भूमिका

  • संतभूमी असलेल्‍या महाराष्‍ट्रात असे होणे, याहून दुसरे दुर्दैव कोणते ? रसायनयुक्‍त सांडपाणी सोडणार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्‍यक आहे.
  • पर्यावरणाच्‍या नावाखाली गणेशोत्‍सवामध्‍ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केल्‍यावर प्रदूषण होते, अशी ओरड करणारे आता काहीच बोलणार नाहीत, हे लक्षात घ्‍या !