नवी मुंबईत आर्.टी.ई. अंतर्गत पहिल्‍या सोडतीत १ सहस्र ५०९ विद्यार्थ्‍यांनी प्रवेश घेतला !

नवी मुंबई, १ जून (वार्ता.) – नवी मुंबईत शिक्षण हक्‍क कायद्याअंतर्गत (आर्.टी.ई.) ९८ शाळांमध्‍ये पहिल्‍या लॉटरीत १ सहस्र ५०९ विद्यार्थ्‍यांनी प्रवेश घेतला आहे, अशी माहिती शिक्षण अधिकारी अरुणा यादव यांनी दिली.

बालकांचा विनामूल्‍य आणि सक्‍तीचा शिक्षणाचा हक्‍क अधिनियम २००९ अन्‍वये प्रतीवर्षीप्रमाणे २५ टक्‍के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्‍यात ऑनलाईन पद्धतीने राबवण्‍यात येते. त्‍यानुसार २०२२-२३ शैक्षणिक वर्षासाठी आर्.टी.ई. २५ टक्‍के प्रवेश प्रक्रियेची सोडत (लॉटरी) ५ एप्रिल २०२३ या दिवशी महाराष्‍ट्र राज्‍य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथे विद्यार्थ्‍यांच्‍या हस्‍ते काढण्‍यात आली आहे.