(म्हणे) ‘मुसलमानांविषयी इतका द्वेष असेल, तर आमने-सामने लढा !’ – मौलाना तौकीर रझा

  • ‘इत्तेहादे मिल्लत काऊंसिल’चे प्रमुख मौलाना तौकीर रझा यांचे चिथावणीखोर आव्हान !

  • कुणामध्येही भारताला हिंदु राष्ट्र करण्याइतका दम नसल्याचाही दावा !

बरेली (उत्तरप्रदेश) – येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी ‘इत्तेहादे मिल्लत काऊंसिल’चे प्रमुख मौलाना तौकीर रझा यांनी कुख्यात गुंड अतिक अहमद याच्या हत्येचा, तसेच समाजवादी पक्षाचे आमदार आझम खान यांच्यावरील कथित अत्याचारांचा सूड उगवणार असल्याचे म्हटले आहे. (अशा प्रकारची विधाने करूनही भारतातील तथाकथित लोकशाहीप्रेमी आणि कायदाप्रेमी राजकीय पक्ष मात्र गप्प आहेत, हे लक्षात घ्या ! – संपादक)  इतकेच नाही, तर ‘कुणामध्येही भारताला हिंदु राष्ट्र करण्याइतका दम नाही. मुसलमानांविषयी इतका द्वेष असेल, तर आमने-सामने लढा’, असे चिथावणीखोर आव्हान दिले आहे.

मौलाना रझा म्हणाले की, आता जी स्थिती आहे, ती पुढे आणखी वाईट होणार आहे. स्वतःची स्थिती सुधारण्यासाठी सूड उगवा.

संपादकीय भूमिका

  • अशा पोकळ धमक्या देऊन रझा यांच्यासारखे मौलाना मुसलमानांचे नेते बनू पहात आहेत. अशांवर उत्तरप्रदेश सरकारने कारवाई करून त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !
  • अकबरुद्दीन ओवैसी ‘पोलिसांना १५ मिनिटे बाजुला करा, ७५ कोटी हिंदूंना धडा शिकवू’, असे म्हणतात, तर मौलानासुद्धा हिंदूंशी दोन हात करण्याचे चिथावणीखोर आव्हान करतात ! यावरून अशा मुसलमानांच्या मनात काय चालू आहे, हे हिंदूंनी लक्षात घेऊन सतर्क रहायला हवे !