हिंदूसंघटनासाठी आध्‍यात्मिक शक्‍तीचा मार्ग गुरुजींनी दाखवला ! – (पू.) अधिवक्‍ता हरिशंकर जैन, सर्वोच्‍च न्‍यायालय

(पू.) अधिवक्‍ता हरिशंकर जैन

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जन्‍मोत्‍सव साजरा होत आहे, ही फार आनंदाची गोष्‍ट आहे. वास्‍ताविक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले ईश्‍वरस्‍वरूपात अवतरित झाले आहेत. ते प्रेरणास्रोत आहेत. त्‍यांनी संपूर्ण समाज आणि मानवजात यांना जी शिकवण दिली आणि जो मार्ग दाखवला, त्‍यावर मार्गक्रमण करून आपण संपूर्ण देशाला पुष्‍कळ पुढे घेऊन जाऊ शकतो अन् संपूर्ण मानवजातीची सेवा करू शकतो. आज हिंदु समाज संघटित होणे आवश्‍यक आहे आणि या संघटनासाठी आध्‍यात्मिक शक्‍तीचे अधिष्‍ठान असणे आवश्‍यक आहे. या आध्‍यात्मिक शक्‍तीचा मार्ग माननीय गुरुजींनी (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) दाखवला आहे. त्‍याचा अनेक लोकांनी लाभ करून घेतला आहे. प्रतिवर्षी अनेक लोक सनातनच्‍या रामनाथी, फोंडा, गोवा येथील आश्रमात येतात आणि कृतकृत्‍य होतात. या जन्‍मोत्‍सवाच्‍या शुभप्रसंगी ईश्‍वराने त्‍यांना दीर्घायुषी आणि निरोगी ठेवावे, जेणेकरून आम्‍हाला त्‍यांचे पुष्‍कळ आशीर्वाद मिळतील, अशी मी ईश्‍वरचरणी प्रार्थना करतो.’

(२.५.२०२३)