परात्पर गुरुदेवांच्या दैवी चैतन्यामुळे हिंदुत्वाचे कार्य संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात होत आहे ! – अर्जुन संपथ, ‘हिंदु मक्कल कत्छी’ (हिंदु जनता पक्ष)       

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘संत थिरूमूलार यांनी ‘थिरूमंदिरम्’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या एका प्राचीन तमिळ ग्रंथात मनुष्याच्या जीवनात असलेले गुरूंचे महत्त्व वर्णन केले आहे. ते म्हणतात, ‘श्री गुरूंच्या दिव्य रूपाच्या दर्शनाने, श्री गुरूंच्या दैवी नामाचा जप केल्याने आणि श्री गुरूंची दिव्य वाणी ऐकल्याने मन शुद्ध होते; तसेच केवळ श्री गुरूंच्या रूपाचे चिंतन केल्यास मन शुद्ध होते.’ – थिरूमंदिरम्, श्लोक १३७

श्री. अर्जुन संपथ

१. परात्पर गुरु डॉ. आठवले ‘सनातन संस्थे’च्या माध्यमातून संपूर्ण देशभर राष्ट्ररक्षण आणि अध्यात्मप्रसार यांचे कार्य करत आहेत. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिष्यांना (साधकांना) सिद्ध केले आहे.

२. ते संपूर्ण जगात सनातन हिंदु धर्माने सांगितलेल्या सात्त्विक जीवनशैलीचा प्रसार करत आहेत.

३. ‘भारतात हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे’, यासाठी ते प्रयत्नशील असून त्यांचे हे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी परात्पर गुरुदेवांनी घडवलेले साधक अविश्रांत श्रम घेत आहेत. परात्पर गुरुदेवांच्या दैवी चैतन्यामुळे हिंदुत्वाचे कार्य संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात चालू आहे.

५. गुरुदेवांची कृपा आणि आशीर्वाद यांमुळे मी गेल्या १० वर्षांपासून हिंदुत्वाचे कार्य करत आहे.

६. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने मी कित्येक कठीण प्रसंगांतून बाहेर पडू शकलो आहे. एकदा काही गुंडांनी माझ्या घरावर पेट्रोल बाँब फेकला होता. केवळ परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळेच आमचे प्राण वाचले. अशा कित्येक दिव्य अनुभूती मला आल्या आहेत.’

– श्री. अर्जुन संपथ, संस्थापक-अध्यक्ष, हिंदु मक्कल कत्छी (हिंदु जनता पक्ष), कोइम्बतूर, तमिळनाडू. (२५.४.२०२३)