असे आहेत मारामारी करणारे लोकप्रतिनिधी !

सभागृहात गोंधळ

‘देहली महानगरपालिकेच्‍या स्‍थायी समितीच्‍या निवडणुकीला २२ फेब्रुवारी २०२३ च्‍या सायंकाळी प्रारंभ झाल्‍यानंतर सभागृहात गोंधळ चालू झाला. हा गोंधळ रात्री उशिरापर्यंत चालू होता. भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्‍या पुरुष अन् महिला नगरसेवक यांच्‍यात हाणामारी झाली. लाथाबुक्‍क्‍यांनी एकमेकांना मारहाण करण्‍यात आली. तसेच या वेळी खुर्च्‍या, सफरचंद, माईक, बाटल्‍या आदी वस्‍तू एकमेकांवर फेकून मारण्‍यात आल्‍या. निवडणुकीसाठीची मतपेटी फेकून देण्‍यात आली.’