बांगलादेशी घुसखोर रिझवान याच्या घरात सापडले लाखो रुपये

देशाच्या सुरक्षेला धोका असल्याची गुप्तचर यंत्रणांची चेतावणी

कानपूर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील कानपूर येथे अवैधपणे रहाणारा बांगलादेशी घुसखोर रिझवान आणि त्याचे कुटुंबीय यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. रिझवान आणि त्याचे कुटुंब प्रतिमास लाखो रुपये खर्च करत होते; मात्र त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याचे अन्वेषणात समोर आले आहे. (पोलिसांनी या घुसखोरांची कसून चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी राष्ट्रप्रेमी भारतियांची अपेक्षा आहे ! – संपादक)

१. रिजवान आणि त्याचे कुटुंबीय यांची अधिकोषात ४ खाती असल्याचे आढळून आले.

२. नोव्हेंबरमध्ये रिझवानच्या बँक खात्यात आठ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत; मात्र हे पैसे कोणी पाठवले, याची माहिती मिळू शकली नाही. सध्या पोलीस याविषयी अन्वेषण करत आहेत.

३. रिझवानच्या घरावर छापा टाकला असता पोलिसांना सुमारे १४ लाख रुपये रोख सापडले. याशिवाय त्याच्या घरात विदेशी चलन, महागडे दागिने, बनावट कागदपत्रे आणि बांगलादेशसह भारतीय पासपोर्ट आदी वस्तू मिळाल्या आहेत.

४. रिझवान याने पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ या देशांचा दौरा केल्याचेही उघड झाले.

५. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कानपूर पोलिसांनी गुप्तचर यंत्रणांना सतर्क केले आहे. गुप्तचर यंत्रणेनेही या कुटुंबापासून देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचे म्हटले आहे.

६. रिझवान याचे कुटुंब वर्ष २०१६ पासून अवैधरित्या भारतात वास्तव्य करत आहे. त्या वेळी आरोपींच्या कागदपत्रांची पडताळणी कानपूरमधील समाजवादी पक्षाचे आमदार हाजी इरफान यांनी केली होती. ते कुटुंबीय भारतीय असल्याचे प्रमाणपत्र इरफान यांनी दिले होते. त्यांनीच सर्वांचे आधारकार्ड बनवण्यास साहाय्य केले होते. (घुसखोरांना अधिकृत कागदपत्रे मिळवून देणार्‍या समाजवादी पक्षाच्या आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रहित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे योग्य ठरेल ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

घुसखोरांकडे एवढे पैसे, दागिने आणि कागदपत्रे येईपर्यंत स्थानिक प्रशासन काय करत होते ?