‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या धर्मबाह्य संकल्पना न राबवता नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती द्यावी ! – शिवसेनेचे कागल प्रशासनास निवेदन

नगरपालिका प्रशासन टिना गवळी (बसलेल्या) यांना निवेदन देतांना श्री. संभाजीराव भोकरे (दाढी, तसेच नाम लावलेले), तसेच अन्य

कागल (जिल्हा कोल्हापूर) – वर्षभर रासायनिक कारखाने, सांडपाणी आणि कचरा यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी कृती केली जात नाही; मात्र तेच महापालिका प्रशासन अन् पर्यावरणवादी वर्षातून एकदाच येणार्‍या गणेशोत्सवाला प्रदूषणासाठी उत्तरदायी ठरवतात. अनेक ठिकाणी बलपूर्वक श्री गणेशमूर्तींचे दान करण्यास किंवा कोट्यवधी रुपये व्यय करून बांधलेल्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यास सामान्य गणेशभक्तांना भाग पाडले जात आहे. साखर कारखान्यांचे पाणी नदीत सोडल्याने सहस्रो मासे मृत झाल्याच्या घटना गेल्या दोन वर्षांत घडलेल्या आहेत. तरी प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या धर्मबाह्य संकल्पना न राबवता नदीच्या वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती द्यावी, या मागणीचे निवेदन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे यांनी कागल नगरपालिका प्रशासक टिना गवळी यांना दिले. या प्रसंगी सर्वश्री विजय आरेकर, जयसिंग टिकले, राजेंद्र साळुंखे, स्वप्नील माने, युवराज येजरे यांसह अन्य उपस्थित होते.