एका महिलेवर ती अल्पवयीन असतांना बलात्कार करणार्‍या २ मुसलमानांना २८ वर्षांनंतर अटक

नवी देहली – एका महिलेवर ती अल्पवयीन असतांना उत्तरप्रदेशातील हरदोई येथे २ मुसलमानांनी बलात्कार केला होता. आता तब्बल २८ वर्षांनी तिच्या मुलाने आईला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या दोघांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार १९९४ मध्ये ही घटना घडली होती. त्यावेळी पीडित मुलगी १२ वर्षांची होती. ती तिच्या मोठ्या बहिणीसोबत राहत होती. तिची बहीण एका खासगी शाळेत शिकवत होती. एके दिवशी वस्तीतील नकी हसन याने घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. दुसर्‍या दिवशी त्याचा भाऊ महंमद रझी उर्फ गुड्डू याने तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलगी गरोदर राहिली. तिने एका मुलाला जन्म दिला. तो मुलगा हरदोई येथील एका जोडप्याला दत्तक दिला गेला. त्या मुलाला ‘माझ्या पालकांनी मला दत्तक घेतले आहे’, याची माहिती मिळाली. त्याने त्याच्या जन्मदात्या आईचा शोध घेतला. त्याला आईसोबत घडलेल्या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाली. पीडितेने मुलाच्या सांगण्यावरून आरोपीला शिक्षा व्हावी, यासाठी न्यायालयात दाद मागितली.

४ मार्च २०२१ या दिवशी महिलेने न्यायालयाच्या आदेशावरून पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. शहाजहानपूरचे पोलीस उपअधीक्षक एस्. आनंद यांनी, ‘पुष्कळ अन्वेषण केल्यानंतर दोन्ही आरोपींविषयी माहिती मिळाली. ४८ वर्षीय महंमद रझी  भाग्यनगर येथे लपून बसला होता. त्याला अटक करण्यात आली. दुसरा आरोपी ओडिशामध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल. आरोपीने गुन्ह्याची स्वीकृती दिली आहे’, असे सांगितले आहे.

संपादकीय भूमिका

अल्पसंख्य असलेले मुसलमान गुन्हेगारीमध्ये मात्र बहुसंख्य !