हिंदूंनी जातपात विसरून संघटित व्हावे ! – अतुल अर्वेनला, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, नागपूर

वाहनी (भंडारा) येथे कृतीशील धर्माभिमान्यांच्या पुढाकारातून हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

श्री. अतुल आर्वेन्ला

नागपूर, २ जुलै (वार्ता.) – आज जातपात विसरून सर्वांनी हिंदू म्हणून संघटित होण्ो आवश्यक आहे. हिंदूंसमोर असलेल्या विविध समस्यांवर हिंदु राष्ट्र हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे सर्व हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची मागणी करणे आणि त्यासाठी संघटित होऊन प्रयत्न करणे काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन येथील हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. अतुल अर्वेनला यांनी केले. वाहनी (जिल्हा भंडारा) येथे कृतीशील धर्माभिमान्यांच्या पुढाकारातून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ घेण्यात आली. त्यात श्री. अर्वेनला बोलत होते. या सभेला सनातन संस्थेच्या अधिवक्त्या (सौ.) वैशाली परांजपे यांनीही संबोधित केले.

क्षणचित्रे 

१. श्री. सुदर्शन सोनेवाने यांची त्यांच्या गावात धर्मसभा व्हावी आणि सर्वांना लाभ व्हावा, अशी तळमळ होती. आदल्या दिवशी रात्रपाळी असतांनाही त्यांनी दुसऱ्या दिवशी सभास्थळी तळमळीने सेवा केली.

२. धर्माभिमानी श्री. रवींद्र भोंदेकर, श्री. वैभव खोब्रागडे आणि त्यांचे युवा सहकारी यांनी धर्मसभेसाठी उत्स्फूर्तपणे सेवा केली.