(म्हणे) ‘देशात रक्तपात झाला, तरीही अग्नीपथ योजना लागू होऊ देणार नाही !’

काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांची धमकी !

काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी

जामतारा (झारखंड) – देश जळत आहे. ८ वर्षे झाली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत तरुणांना कोणतीही नोकरी दिलेली नाही. आज आपल्याच देशाला विकले जात आहे. आपली विमाने, कारखाने सर्वकाही विकले गेले आहेत. आज ते देशाच्या सैन्याला विकत आहेत. त्यामुळे देशात आक्रोश दिसून येत आहे. देशात रक्तपात झाला, तरी चालेल. आम्ही कोणत्याही किमतीत अग्नीपथ योजना लागू होऊ देणार नाही, अशी धमकी येथील काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांनी दिली आहे. येथे १८ जून या दिवशी काँग्रेसकडून या योजनेच्या विरोधात आंदोलन आयोजित केले होते. त्या वेळी अन्सारी बोलत होते. या वेळी पंतप्रधान मोदी यांचा पुतळा जाळण्यात आला.

आमदार अन्सारी यांनी १० जून या दिवशी रांची येथे मुसलमानांनी नमाजानंतर नूपुर शर्मा यांच्या विरोधात केलेल्या हिंसाचाराचे समर्थन केले होते. तसेच यात पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेल्या दोघा मुसलमानांना ‘शहीद’ दर्जा देण्याची मागणी केली होती. तसेच पोलिसांच्या गोळीबाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. (दंगलखोरांच्या पाठीशी रहाणार्‍यांची आमदारकी रहित करण्याचा कायदा आता करण्याची आवश्यकता आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

भारतीय सैन्याशी निगडित योजनेवरून अशा प्रकारची धमकी देणार्‍यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा झाली पाहिजे !