केरळ उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे अंतर्वस्त्र भगवे आहे !

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे नेते याहिया तंगल यांचे न्यायालयाचा अवमान करणारे विधान !

थिरूवनंतपूरम् (केरळ) – आमच्या अलप्पुझा येथील सभेतील घोषणा ऐकून केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आश्‍चर्यचकित झाले. याचे कारण तुम्हाला ठाऊक आहे का ? याचे कारण म्हणजे त्यांचे अंतर्वस्त्र भगवे आहे. भगवा असल्यामुळेच ते लवकर गरम होतात, असे आक्षेपार्ह विधान केरळमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे (पी.एफ्.आय.चे) नेते याहिया तंगल यांनी केले. अलप्पुझा येथील सभेत देण्यात आलेल्या प्रक्षोभक घोषणांवरून केरळ उच्च न्यायालयाने पी.एफ.्आय.च्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. त्यावर तंगल यांनी हे विधान केले. अलप्पुझा येथील सभेच्या वेळी मुसलमान मुलाकडून हिंदूंच्या विरोधात प्रक्षोभक घोषणा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्याला या घोषणा सांगणार्‍याला आणि त्या मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आली.

संपादकीय भूमिका

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घातली जात नसल्याचाच हा परिणाम आहे !