ठाणे येथील सेवाकेंद्रात सद्गुरु अनुराधा वाडेकर यांची भेट झाल्यानंतर मृत मुलाची आठवण येऊनही रडू न येणे

सौ. अपर्णा विलास गोरे

१. मृत मुलाच्या जन्मदिनानिमित्त धान्य अर्पण करण्यासाठी सेवाकेंद्रात जाणे, तेथे सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर यांची भेट झाल्यावर मोकळे वाटणे : ३ वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने माझ्या ३७ वर्षांच्या मुलाचे निधन झाले. ७.१.२०२२ या दिवशी त्याच्या जन्मदिनानिमित्त धान्य अर्पण करण्याकरता मी आणि माझे यजमान ठाणे येथील सनातन संस्थेच्या सेवाकेंद्रात गेलो होतो. त्या वेळी सद्गुरु अनुराधा वाडेकर आमच्याशी अर्धा घंटा बोलल्या. तेथून घरी आल्यावर मला पुष्कळ मोकळे वाटत होते.

२. सद्गुरु अनुताईंना भेटल्यानंतर मृत मुलाची आठवण आली, तरी रडू न येणे : ‘मुलाला लवकर मुक्ती मिळावी’, यासाठी प्रतिदिन प्रार्थना करतांना किंवा अन्य वेळी त्याची आठवण येऊन मला रडू येत असे; परंतु सद्गुरु अनुताईंना भेटल्यानंतर मला त्याची आठवण झाली, तरी रडू येत नाही. मी याविषयी एका साधिकेला सांगितल्यावर ती म्हणाली, ‘‘याचा अर्थ तुमचा मुलगा पुढे गेला !’’ (मुलाला पुढची गती मिळाली.)

मी केवळ ‘सनातन प्रभात’ची जिज्ञासू वाचिका आहे, तरीही सद्गुरु अनुताईंच्या कृपेमुळे मला ही अनुभूती आली. त्याबद्दल परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु अनुताई यांच्या चरणी कोटीशः प्रणाम !

– सौ. अपर्णा विलास गोरे, ठाणे, महाराष्ट्र. (२८.१.२०२२)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक