महाशिवरात्रीच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यात सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन, फलक प्रदर्शन आणि व्याख्यान यांच्या माध्यमातून व्यापक धर्मप्रसार !

सांगली, २ मार्च (वार्ता.) – महाशिवरात्रीच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने, ग्रंथप्रदर्शन, फलक लेखन, प्रत्यक्ष आणि ‘ऑनलाईन’ व्याख्यान यांच्या माध्यमातून व्यापक धर्मप्रसार करण्यात आला. जिल्ह्यात २० हून अधिक ठिकाणी ग्रंथप्रदर्शन कक्ष उभारण्यात आले होते. हरिपूर येथील संगमेश्वर या ठिकाणी उभारण्यात आलेल्या विशेष कक्षाला भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. येथे प्रथमोपचार कक्षाच्या माध्यमातून लोकांना प्रथमोपचाराची माहिती देण्यात आली.

मिरज येथील काशी विश्वेश्वर देवालय येथे लावण्यात आलेले धर्मशिक्षण विषयक प्रदर्शन पहातांना जिज्ञासू

१. हरिपूर येथील कक्षास सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या भाजप नगरसेविका सौ. सुनंदा राऊत यांनी भेट दिली, तर निशांत कॉलनी येथील कक्षास सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे महापौर श्री. दिग्विजय सूर्यवंशी, भाजपचे नगरसेवक श्री. लक्ष्मण नवलाई यांनी भेट दिली. हरिपूर येथील पोलीस पाटील यांनी ‘‘गेली अनेक वर्षे सनातन संस्था येथे ग्रंथप्रदर्शन लावत आहे. या माध्यमातून लोकांना महत्त्वाची धर्मविषयक माहिती मिळत आहे’’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

हरिपूर (सांगली) येथील संगमेश्वर येथील ग्रंथप्रदर्शनात भाजप नगरसेविका सौ. सुनंदा राऊत यांना माहिती देतांना सौ. सरिता चौगुले
हरिपूर येथे लावलेला प्रथमोपचार कक्ष

२. जिल्ह्यात ठिकठिकाणी करण्यात आलेल्या फलक लेखनात धर्मप्रेमींचा सहभाग होता.

३. मिरज येथील काशी विश्वेश्वर मंदिर येथे ३ दिवस ग्रंथप्रदर्शनासमवेत धर्मशिक्षणविषयक फलक लावण्यात आले होते. येथे अनेक जिज्ञासूंनी फलकांचे भ्रमणभाषवर छायाचित्र काढले. या ठिकाणी चालू असणार्‍या कीर्तन महोत्सवात वैद्या श्रीमती मृणालीनी भोसले यांचे ‘धर्मशिक्षण काळाची आवश्यकता’ यावर व्याख्यान झाले.

मिरज येथील काशी विश्वेश्वर देवालय येथे चालू असणार्‍या कीर्तन महोत्सवात मार्गदर्शन करतांना वैद्या श्रीमती मृणालीनी भोसले

४. कवठेमहांकाळ, तसेच अन्य काही ठिकाणी ३ दिवसांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. सर्वत्रच्या प्रदर्शन कक्षास रात्री विलंबापर्यंत भाविक-जिज्ञासू यांचा ओघ कायम होता.

५. जत केंद्राच्या वतीने कर्नाटक येथे रामलिंगेश्वर देवालय, अथणी येथे कक्ष लावण्यात आला होता, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला.

६. तुजारपूर (इश्वरपूर) येथे धर्मप्रेमी श्रीमती सुमन पवार आणि श्रीमती मंगल नाईक, तसेच सौ. दीपाली पवार, सौ. शकुंतला गुरव, सौ. लता पवार, सौ. विजया बाबर, सौ. सीमा साळुंखे यांनी पुढाकार ग्रंथप्रदर्शन लावले, तसेच महादेव मंदिरात अखंड ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप लावला होता. या कक्षाला जिज्ञासू आणि भाविक यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

शिंगण येथील श्री महादेव मंदिर येथील ग्रंथप्रदर्शन कक्षास भेट देतांना कापूसखेड येथील वारकरी ह.भ.प. किसन बाबा बल्लाळ

 

मिरज येथील श्री मल्लिकार्जुन देवालय येथे ग्रंथप्रदर्शनात ग्रंथ खरेदी करतांना जिज्ञासू
श्रीक्षेत्र रेवणसिद्ध येथे लावण्यात आलेले ग्रंथ प्रदर्शन
कवठेमहाकांळ येथे लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनास भेट देतांना जिज्ञासू
कवठेमहाकांळ येथे लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनास भेट देणार्‍या जिज्ञासूंना माहिती सागतांना सनातनच्या साधिका सौ. कल्पना थोरात
जयसिंगपूर येथे लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनास भेट देणारे जिज्ञासू
कवठेमहांकाळ येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे ग्रंथप्रदर्शन कक्ष उभारण्यास जागा उपलब्ध करून देण्यापासून लागणार्‍या प्रत्येक गोष्टीसाठी नगर पंचायत प्रशासनाने पुष्कळ चांगले सहकार्य केले. येथे मंदिरात असलेल्या ध्वनीक्षेपक यंत्रणेद्वारे सनातन संस्थेच्या वतीने दिवसभर भाविकांना ‘‘शिवतत्त्व १ सहस्रपटीने कार्यरत असल्याने भाविकांनी ‘ॐ नम: शिवाय ।’ हा नामजप करावा, रांगेत शांतपणे दर्शन घ्यावे’’, असे आवाहन करण्यात येत होते.

श्री क्षेत्र रेवणसिद्ध (विटा) येथील जिज्ञासूंच्या प्रतिक्रिया

१. श्री. अमोल आनंदा हिंडे, विटा – सनातनचे कार्य पुष्कळ चांगले आहे. आपले विचार पुढील पिढीपर्यंत पोचवण्याचे कार्य उत्तम आहे. आपल्या पंचांगातून रशियन युद्ध होणार, हे सत्य अगोदरच समजले होते. आपल्या वर्गांच्या माध्यमातून हिंदु धर्मप्रसार आणि प्रचार यांचे कार्य उत्तम घडत आहे. आम्ही त्याचा छोटासा भाग होऊ इच्छितो.

२. श्री. अमित वि. पाटील, विटा – देशाच्या कार्यात सनातन संस्थेचे कार्य मोलाचे आहे. सनातन संस्था धर्मजागृतीचे कार्य करत राहील, त्यासाठी जे करता येईल, ते आम्ही करत राहू. माझा पूर्णतः पाठिंबा राहील.