स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सावरकर दर्शन प्रतिष्ठान आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्याकडून व्याख्यानाचे आयोजन !

मुंबई –  स्वातंत्र्यीवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या दिनी सावरकर दर्शन प्रतिष्ठान आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिनाच्या निमित्ताने….’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे अभ्यासक दुर्गेश परुळकर या वेळी उपस्थितांना संबोधित करणार आहे. २६ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता वडाळा येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सभागृहात का कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी ८५९१७०३३०४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.