महंमद पैगंबर यांच्या संदर्भातील व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित केल्यामुळे धर्मांधांकडून हत्या झाल्याचा संशय
|
कर्णावती (गुजरात) – येथील धंधुका तालुक्यामध्ये किशन बोलिया नावाच्या एका तरुणाची मोटार सायकलवरून आलेल्या दोघा आरोपींनी गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध चालू केला आहे; मात्र स्थानिक लोक यावर संतुष्ट नाहीत.
१. किशन यांनी सामाजिक माध्यमांमध्ये एक व्हिडिओ प्रसारित केला होता. हा व्हिडिओ महंमद पैगंबर यांच्या संदर्भात होता. यास काही जणांनी विरोध केला होता. पोलिसांनीही किशन यांच्यावर कारवाई चालू केली होती. त्यानंतर किशन यांनी त्यांचे खाते खासगी (प्रायव्हेट करणे, यामुळे सर्वांना ते पहाता येत नाही) केले होते. या प्रकरणामुळेच धर्मांधांकडून किशन यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
२. हत्येनंतर किशन यांच्या नातेवाइकांनी त्याचे शव कह्यात घेण्यास नकार दिला. हिंदु संघटनांच्या हस्तक्षेपानंतर पोलिसांनी आरोपींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर शव कह्यात घेण्यात आले. मोठ्या पोलीस बंदोबस्तात किशन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.