१. चांगली आध्यात्मिक पातळी आणि कुशाग्र बुद्धी असल्यामुळे सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या माध्यमातून करत असलेले वाचन आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे
‘श्री. मनीष सहगल यांच्याशी झालेल्या लहानशा भेटीत मला जाणवले, ‘त्यांची आध्यात्मिक पातळी चांगली आहे; परंतु त्यांना तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. मी त्यांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपासह ‘फेसबूक’वरील माझे काही लिखाण किंवा सनातनचे ज्ञान, हिंदु जनजागृति समिती आणि सनातन संस्थेचे संकेतस्थळ या माध्यमातून सहभागी करून त्यांना ते वाचायला सांगितले होते. ‘चांगली आध्यात्मिक पातळी आणि कुशाग्र बुद्धी असल्यामुळे ते जे काही वाचत होते, ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करत होते.’ आरंभी तीन-चार वर्षे ते अधिक क्रियाशील नव्हते; परंतु ते व्यष्टी स्तरावर थोडे प्रयत्न करत रहायचे आणि कधी कधी ते माझ्याशी साधनेविषयी बोलत होते.
२. काही मासांनी नियमित मासिक अर्पण देण्यास आरंभ करणे आणि त्यानंतर श्री. सहगल यांचे त्रास दूर होणे अन् समष्टी साधनेलाही आरंभ करणे
वर्ष २०१४ मध्ये देहलीमध्ये ‘उपासना केंद्रा’चा आश्रम झाल्यानंतर त्यांनी नियमित मासिक अर्पण देण्यास आरंभ केला. त्यानंतर त्यांचे त्रास न्यून होऊ लागले आणि त्यासह ते हळूहळू समष्टी साधनासुद्धा करायला लागले. मी धर्मप्रसार करतांना पाहिले की, ज्यांना वेळेअभावी किंवा आध्यात्मिक त्रासामुळे व्यष्टी आणि समष्टी साधना सातत्याने करता येत नाही, त्यांनी नियमितपणे अन् भावपूर्वक मासिक अर्पण दिले, तर त्यांच्या साधनेशी संबंधित अडचणी दूर होऊ लागतात अन् ते साधनेच्या मार्गावर शीघ्र गतीने मार्गक्रमण करू लागतात.
३. उत्तर भारतात बहुतेक हिंदूंना तीव्र आध्यात्मिक त्रास असल्याने इच्छा असूनही चांगली साधना करण्यात अडचण येणे आणि त्यांना मासिक अर्पण देण्यास सांगितल्यावर त्यांच्या साधनेत सातत्य येणे
उत्तर भारतात धर्माचा अत्यंत र्हास झाला आहे आणि तेथे समष्टी संतसुद्धा अल्प आहेत; म्हणून बहुतेक हिंदूंना तीव्र आध्यात्मिक त्रास आहेत. त्यामुळे मी पाहिले, ‘कुणी साधक इच्छा असूनही चांगली व्यष्टी आणि समष्टी साधना करू शकत नाही. तेव्हा मी त्यांना मासिक अर्पण करण्यास सांगते. त्यामुळे त्यांतून त्यांच्या साधनेत सातत्य येते. श्री. मनीष सहगल हे याचे एक चांगले उदाहरण आहे.
४. श्री. मनीष यांच्या आईने मला कृतज्ञताभावाने म्हटले, ‘‘आज मनीषने जी काही लौकिक जगात प्रगती केली आहे, तो साधनेचाच परिणाम आहे.’’ त्यांचे आई-वडीलसुद्धा अत्यंत सात्त्विक आहेत.’
५. श्री. मनीष यांची समष्टी साधना
५ अ. ‘युवावस्थेतील विद्यार्थ्यांकडून साधना करवून घ्या’, असे पू. तनुजा ठाकूर यांनी सांगणे आणि श्री. सहगल यांनी प्रयत्न केल्यावर शाळेतील अनेक युवा विद्यार्थ्यांनी साधना करण्यास प्रारंभ करणे : ते एका शाळेत शिक्षक आहेत आणि त्यानंतर ते खासगी शिकवण्या घेण्यासाठी जातात. त्यांना संगणकाचे काहीच ज्ञान नाही आणि त्यांच्याकडे संगणकसुद्धा नाही. त्यामुळे मी त्यांना युवावस्थेतील (नववी, दहावी इयत्तेतील) विद्यार्थ्यांकडून साधना करवून घेण्याविषयी सांगितले. ते एका ‘कॉन्व्हेंट’ शाळेत शिकवतात. त्यामुळे ते उघडपणे धर्म आणि अध्यात्म याविषयी काही बोलू शकत नाहीत; परंतु मागील चार-पाच वर्षांपासून थोडे-थोडे आणि सतत प्रयत्न करत राहिल्यावर आता त्यांच्या शाळेतील अनेक युवा विद्यार्थी साधना करायला लागले आहेत.
५ आ. विद्यार्थ्यांचा ‘व्हॉट्सॲप’ गट करून त्याद्वारे त्यांच्या साधनेचा आढावा घेणे आणि एक साधक-शिक्षक बनण्याचा प्रयत्न करत असणे : त्यांनी विद्यार्थ्यांचा ‘व्हॉट्सॲप’ गट बनवला आहे. त्यामध्ये ते विद्यार्थ्यांना आपल्या साधनेचा आढावा नियमितपणे पाठवायला सांगतात. आता विद्यार्थी नामजपाच्या समवेतच स्वभावदोष निर्मूलनाचे प्रयत्नसुद्धा करू लागले आहेत आणि ‘व्हॉट्सॲप’ गटात आपल्या चुका सांगतात. आता अनेक विद्यार्थ्यांना यापासून झालेले लाभसुद्धा लक्षात येत आहेत. अशा प्रकारे ते एक साधक-शिक्षक बनण्याचा प्रयत्न करत आहेत.
५ इ. हिंदी भाषेचे शुद्ध उच्चारही शिकून घेणे आणि ‘ऑनलाईन’ सत्संग अन् ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्ग घेण्याचीही सेवा करणे : त्या समवेत ते हिंदु वार्ताचा लेख सिद्ध करून तो ध्वनीमुद्रितही करतात. त्याचे प्रसारण श्रव्य हिंदु वार्तेच्या रूपात मागील सहा वर्षांपासून होत आहे आणि ही सेवा ते मागील दोन वर्षांपासून नियमितपणे करत आहेत. ही वार्ता प्रत्येक चार दिवसानंतर जवळजवळ ३०० ‘व्हॉट्सॲप’ गटांत ‘उपासना केंद्रा’च्या भ्रमणभाषवरून प्रसारित होते. श्री. मनीष यांनी हिंदी भाषेचे शुद्ध उच्चार शिकून घेतले आहेत आणि ते ‘ऑनलाइन’ सत्संग अन् ‘ऑनलाइन’ बालसंस्कारवर्ग घेण्याची सेवाही करतात.
त्यांच्यामध्ये एक चांगली गोष्ट लक्षात आली की, ‘ते अत्यंत व्यस्त असूनसुद्धा त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेत सातत्य असते. त्यांच्यामध्ये पुष्कळ भावही आहे. त्यामुळे त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत आहे.’
– पू. तनुजा ठाकूर (८.११.२०२१)
पू. तनुजा ठाकूर यांनी सांगितल्यानुसार साधनेला प्रारंभ केल्यावर आगरा (उत्तरप्रदेश) येथील श्री. मनीष सहगल यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती‘वर्ष २०११ मध्ये पू. तनुजा ठाकूर आगरा येथे प्रवचनासाठी आल्या होत्या. तेव्हा ईश्वराच्या कृपेने एका परिचितांच्या घरी माझा त्यांच्याशी परिचय झाला. पूज्य ताईंशी माझी केवळ पाच मिनिटांसाठी भेट झाली होती. त्या वेळी पूज्य ताईंनी मला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करण्याविषयी सांगितले आणि आपल्या ‘फेसबूक प्रोफाइल’ला जोडण्यास सांगितले. मी पूज्य ताईंच्या ‘फेसबूक’वरील लेख वाचला आणि त्यातील सूत्रे आचरणात आणल्यानंतर आम्हाला अनेक अनुभूती आल्या. त्यांपैकी काही येथे दिल्या आहेत. १. साधनेला आरंभ केल्यावर अनेक वर्षांनी जुन्या घराची दुरुस्ती करणे शक्य होणे‘पूज्य ताईंचे ‘धर्मधारा श्रव्य (ऑडिओ) सत्संग’ ‘व्हॉट्सॲप’ आणि ‘यू ट्यूब’द्वारे ऐकण्यास मिळाले. ते सत्संग ऐकल्यानंतर मला ‘आमच्या घरात तीव्र पितृदोष होता’, हे लक्षात आले. त्यामुळे वास्तूमध्ये अत्यंत त्रास जाणवत होता. अनेक वर्षांपासूनची ती वास्तू मोडकळीस आली होती आणि आमची इच्छा असूनसुद्धा आम्ही वास्तूमध्ये नवीन बांधकाम करू शकत नव्हतो. पूज्य ताईंनी सांगितलेले उपाय उदा. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करणे, घरात गोमूत्र शिंपडणे, देशी गायीच्या गोवर्या पेटवून त्यात कडुलिंबाची पाने घालून धुरी करणे, सनातन निर्मित उदबत्ती लावणे इत्यादी उपाय केल्यानंतर वर्ष २०१२ मध्ये त्या घराची दुरुस्ती करणे शक्य झाले. २. वसाहतीमध्ये सर्वांकडे असलेल्या पाण्याच्या कूपनलिकेला २०० ते २५० फुटांवर पाणी लागणे; परंतु आमच्या वास्तूला केवळ १२० फुटांवरच पाणी लागणेआमच्या वसाहतीमध्ये (कॉलनीमध्ये) सर्वांकडे पाण्याची कूपनलिका (बोअरवेल) आहे आणि त्या सर्वांकडे २०० ते २५० फुटांवर पाणी लागले. आमच्याकडे मात्र अवघ्या १२० फुटांवर पाण्याचा स्रोत आहे. ‘ही गोष्टसुद्धा वास्तूमध्ये झालेल्या सकारात्मक परिवर्तनाचा प्रभाव आहे’, जो सर्वांसाठी एक आश्चर्याचा विषय आहे. ३. गुरुकृपेने अत्यंत प्रिय असणार्या मांसाहाराचा त्याग करू शकणेमाझी वृत्ती पूर्णतः तामसिक होती आणि मला मांसाहार अत्यंत प्रिय होता. मी सण आणि उत्सवाच्या दिवशीसुद्धा मांसाहार करत होतो. पूज्य तनुजाताईंच्या कृपेने मी वर्ष २०१३ मध्ये स्वतःहून मांसाहाराचा संपूर्णपणे त्याग केला. याचे माझे कुटुंबीय आणि मित्र यांनासुद्धा आश्चर्य वाटले. त्यांचा यावर विश्वासच बसत नव्हता. ‘हे केवळ गुरुकृपेनेच शक्य झाले आहे’, याची मला आतून जाणीव झाली. ४. चारचाकी गाडीच्या अपघातात पुढच्या आसंदीवर असून सुद्धा सुखरूपपणे वाचणेवर्ष २०२० मध्ये आम्ही रामेश्वरम्ला गेलो होतो. तेथून कन्याकुमारीला जातांना आमच्या वाहनाचा अपघात झाला; परंतु यामध्येही पूज्य ताईंच्या कृपेने आम्हा सर्वांच्या जिवाचे रक्षण झाले. ती एक दिव्य अनुभूती होती. चारचाकीच्या पुढच्या आसंदीवर बसल्यावर निष्काळजीपणामुळे आम्ही आसंदीचा पट्टा (‘बेल्ट’) लावला नव्हता. तरीही मला आणि माझ्या पत्नीला केवळ थोडेसे खरचटले; मात्र चारचाकीच्या समोरच्या काचेचा पूर्ण चुरा झाला होता. त्याच चारचाकीमध्ये मागील आसंदीवर बसलेल्या माझ्या मित्राच्या परिवाराला पुष्कळ मार लागला होता.’ (‘अपघातानंतर श्री. मनीष यांनी मला त्वरित दूरभाष केला होता आणि ते पुष्कळ घाबरले होते; परंतु त्यांच्या बोलण्यातून भाव आणि कृतज्ञता दोन्हीही व्यक्त होत होते.’ – पू. तनुजा ठाकूर) |
|