शेख हसीना यांनी वर्ष २०१६ मध्ये हिंदूंवर आक्रमण करणार्‍यांच्या सूत्रधाराला निवडणुकीत दिली होती उमेदवारी ! – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

यावरून हसीना यांचा हिंदुद्वेषी तोंडवळा उघड होतो. अशांच्या राजवटीत हिंदूंचे रक्षण होणे अशक्यच आहे. हे पहाता आता भारताने पुढाकार घेऊन कठोर पाऊल उचलणे आवश्यक ठरले आहे ! – संपादक

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना व बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

नवी देहली – बांगलादेशमध्ये काय होणार आहे ? हिंदूंच्या संपत्तीची तोडफोड करणार्‍या जिहाद्यांना बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना न्याय देतील का ? आपण हे विसरू नये की, निवडणूक लढवण्यासाठी शेख हसीना यांच्या पक्षाने वर्ष २०१६ मध्ये नसीरनगर येथे हिंदूंची घरे आणि मंदिरे यांची तोडफोड करणार्‍यांच्या सूत्रधाराला उमेदवारी दिली होती, अशी माहिती बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ट्वीट करून दिली आहे.