श्री दुर्गादेवी पूजा मंडपावरील आक्रमणे, हा सुनियोजित कट ! – बांगलादेशचे गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल

  • जर हा सुनियोजित कट आहे, तर बांगलादेशाच्या पोलिसांना तो आधीच का कळला नाही आणि आता कळला आहे, तर आक्रमण करणार्‍यांवर आतापर्यंत कठोर कारवाई का करण्यात आली नाही ? याची उत्तरे खान कमाल यांनी दिली पाहिजेत ! – संपादक 
  • सत्तेत असलेल्या बांगलादेशी अवामी लीगचे धर्मांध कार्यकर्ते हिंदूंवर आक्रमण करण्यास नेहमीच पुढे असतात, हे अनेक घटनांत दिसून येते. त्याविषयी कमाल यांना काय म्हणायचे आहे ? – संपादक
(उजवीकडे) बांगलादेशचे गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशमध्ये नवरात्रोत्सवात श्री दुर्गादेवी पूजा मंडपांवर काही धर्मांधांनी कथित ईशनिंदेवरून आक्रमणे केली, तसेच अन्य ठिकाणी हिंदूंच्या  मंदिरांवरही आक्रमणे केली. ही आक्रमणे सुनियोजित कट होता, अशी माहिती  बांगलादेशचे गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल यांनी दिली. कोमिला जिल्ह्यामध्ये झालेल्या आक्रमणांना सरकारने गांभीर्याने घेतले आहे. ‘ही आक्रमणे बांगलादेशमधील धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न आहे’, असेही त्यांनी म्हटले.

गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल पुढे म्हणाले की,

१. या घटना केवळ कोमिलामध्येच नव्हे, तर रामू आणि नासिरनगर येथही घडल्या. अशा प्रकारची आक्रमणे करण्यामागे देशात तणाव निर्माण करून अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचा उद्देश होता.

२. आमचे देशवासीय धर्मांध नाहीत. आम्ही कधीही या ठिकाणी आतंकवादाला पोषक असे वातावरण निर्माण होऊ दिले नाही. हिंदू, मुसलमान, शीख आणि अन्य धर्मीय यांनी एकत्रित येऊन आतंकवादी घटनांचा सामना केला आहे. ही आक्रमणे म्हणजे बांगलादेशमधील विविध धार्मिक समुहांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे.