नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी यांनी सतर्क रहावे ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी

प्रतिकात्मक छायाचित्र

सांगली – सांगली येथील आयर्विन पुलाची पाणीपातळी २९ जुलै या दिवशी दुपारी २ वाजता ३९ फूट नोंदवण्यात आली. सद्यस्थितीत धरण ८६ टक्के भरले असून धरणातील सध्याचा पाणीसाठा आणि संभाव्य पर्जन्यवृष्टीचा विचार करून धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग चालू करण्यात आला आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या वाढीव विसर्गामुळे कृष्णा नदीच्या सध्याच्या पाणीपातळीत १-२ फुटांची वाढ होऊ शकते. तरी नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी यांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांक ०२३३-२३०१८२०, २३०९५२५ या क्रमांकावर संपर्क साधावा.