भीमा नदीचा प्रवाह पालटल्यानेच भीमाशंकर मंदिरात पाणी शिरले !- स्थानिकांचा आरोप

इतिहासात पहिल्यांदाच भीमाशंकर (पुणे) येथील शिवलिंग पाण्याखाली गेले !

भीमाशंकर (पुणे) येथील शिवलिंग पाण्याखाली गेले

भीमाशंकर (पुणे) – भीमाशंकर विकास आराखड्याच्या माध्यमातून मंदिर परिसरात चालू असलेली कामे पावसाळ्यापूर्वी व्हायला हवी होती; मात्र ती वेळेत पूर्ण झाली नाहीत. मंदिर परिसरात चालू असलेल्या नूतनीकरणाच्या कामांमुळे भीमानदीच्या उगमाचा प्रवाह बंद झाला. त्यामुळे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात पावसाचे पाणी थेट मंदिराच्या गाभार्‍यात जाऊन शिवलिंग पाण्याखाली गेले होते. आता प्रशासनाने ही कामे वेळेत पूर्ण करावीत, अशी मागणी मुख्य पुजारी मधुकर गवांदे आणि पंचायत समितीचे सदस्य अमोल पवार यांनी केली आहे. ‘या परिसरात विकासकामे करतांना भीमा नदीचा प्रवाह बदलण्याची आवश्यकता नव्हती’, असा आरोपही त्यांनी केला आहे. इतिहासात पहिल्यांदाच भीमाशंकर येथील शिवलिंग पाण्याखाली गेल्याची घटना घडली आहे.


यानंतर पुरातन आणि महसूल विभागाने भीमाशंकर मंदिर परिसरात पहाणी केली. तसेच ‘पुढील २४ घंट्यांत दुरुस्ती करून पाण्याची वाट मोकळी केली जाईल’, असे तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी सांगितले आहे.