अशी मागणी करण्याची वेळ का येते ? अवैध गोहत्येच्या घटनांत कारवाई न करणार्या प्रशासनाला खडसवा !
ठाणे, १९ जुलै (वार्ता.) – राज्यात गोहत्याबंदी कायदा लागू असतांनाही भिवंडीमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक सामाजिक द्वेष वाढवण्याच्या दृष्टीने अवैध गोहत्या करून मांस विक्री करत आहेत. बकरी ईदच्या निमित्ताने हे प्रकार वाढण्याची शक्यता आहे; मात्र काही विशिष्ट धर्मियांना संतुष्ट करण्यासाठी त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे गोवंशियांच्या हत्येच्या घटना वाढत आहेत. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. अवैध गोहत्या थांबवण्यासाठी विशेष समिती स्थापन करावी, अशी मागणी करणारे निवेदन उच्च न्यायालयाच्या अधिवक्ता पूजा ताले यांनी भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिले आहे.