(म्हणे) ‘फादर स्टॅन स्वामी यांच्याप्रमाणे अनेक ख्रिस्त्यांच्या विरोधात केंद्रशासनाकडून विनाकारण गुन्हे प्रविष्ट !’ – फ्रान्सिस सार्दिन, दक्षिण गोव्याचे काँग्रेसचे खासदार

फ्रान्सिस सार्दिन

मडगाव, १६ जुलै (वार्ता.) – ख्रिस्ती समुदायातील अनेकांवर केंद्रशासनाने विनाकारण गुन्हे प्रविष्ट केले आहेत आणि याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे स्व. फादर स्टॅन स्वामी यांचे आहे, असा आरोप काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी केला आहे. (काँग्रेसनेही हिंदुद्वेषापोटी साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह अनेक हिंदुत्वनिष्ठांवर आतंकवादविरोधी कायद्यांतर्गत विनाकारण गुन्हे नोंद केले होते. त्याविषयी सार्दिन यांना काय म्हणायचे आहे ? – संपादक)

ते पुढे म्हणाले, ‘‘स्व. फादर स्टॅन स्वामी यांना ते अनुसूचित जमातीच्या लोकांसाठी कार्य करत असल्याने त्यांना कह्यात घेण्यात आले. (फादर स्टॅन स्वामी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटाच्या प्रकरणात आरोपी होते आणि न्यायालयाने त्यांना जामीनही नाकारला होता. यावरून घटनेचे गांभीर्य लक्षात येते ! – संपादक) प्रसारमाध्यमातील सदस्यही त्यांना कह्यात घेतले जाईल; म्हणून मोदी शासनाच्या विरोधात काही लिहीत नाहीत. कुणालाही कारागृहात जायचे नसते. फादर स्टॅन स्वामी हे विविध व्याधींनी त्रस्त असल्याने त्यांची मुक्तता करावी, असे पत्र मी १३ ऑक्टोबर २०२० या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले होते. (साध्वी प्रज्ञासिंह यांनाही अनेक व्याधी होत्या. त्यांना मुक्त करण्याविषयी काँग्रेसवाल्यांनी कधी प्रयत्न का केले नाहीत ? – संपादक) फादर स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूच्या प्रकरणी मी काहीच केले नाही, असा आरोप बिनबुडाचा आहे.’’