पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मुलाखत न झाल्याने नैराश्य येऊन युवक स्वप्नील लोणकरने आत्महत्या केली होती. त्याच्या कुटुंबियांना शिवसेना पक्षाच्या वतीने ५ लाख रुपये आणि शिवसेना उपनेते तथा आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने ५ लाख रुपये, असे एकूण १० लाख रुपयांचे साहाय्य राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख यांच्या उपस्थितीत देण्यात आले.