बाळासाहेब काळे बुद्धीबळाची राज्यस्तरीय पंच परीक्षा उत्तीर्ण !

कोल्हापूर – महाराष्ट्र चेस असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बुद्धीबळ पंच परीक्षेत करवीर तालुक्यातील पाचगाव येथील बाळासाहेब काळे हे उत्तीर्ण झाले आहेत. लहानपणापासून बुद्धीबळ खेळाची विशेष आवड असलेले बाळासाहेब काळे हे सध्या कोल्हापुरातील एस् न्यूज या वृत्तवाहिनीत कार्यकारी संपादक या पदावर कार्यरत आहेत. याशिवाय ऑल इंडिया चेस फेडरेशनने काही दिवसांपूर्वी चेस इन स्कूल या कार्यक्रमांतर्गत बुद्धीबळ प्रशिक्षक पदासाठीचे ऑनलाईन प्रशिक्षण त्यांनी घेतले होते. ते प्रशिक्षण त्यांनी पूर्ण करून त्याची परीक्षाही नुकतीच दिली आहे.