सिंधुदुर्ग – जिल्ह्यात १४ जुलैला कोरोनाचे २३० नवीन रुग्ण सापडले. जिल्ह्यात सद्य:स्थितीत ३ सहस्र ३०९ रुग्णांवर उपचार चालू आहेत. आतापर्यंत ४० सहस्र ९४० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. १४ जुलैला ५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे १ सहस्र १४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४५ सहस्र ३९५ झाली आहे. १४ जुलैला २१४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.