सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार १२ ते १६ जुलै या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आवाहन
कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील वाघोटन नदी, दोडामार्ग तालुक्यातील तिलारी नदी आणि कुडाळ तालुक्यातील कर्ली नदी या नद्यांची पाण्याची पातळी धोकादायक पातळीच्या जवळ आली आहे. त्यामुळे या नद्यांच्या काठाजवळील गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.