अनेक गुन्हेगारीच्या प्रसंगात धर्मांध असतातच. त्यांना कठोर शिक्षा होत नसल्याचा परिणाम आहे, असे कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
नवी मुंबई – धर्मांध पिता-पुत्राने अधिकोषाचे कर्ज असलेली गाडी बनावट कागदपत्राद्वारे एका शिक्षकाला विकून त्याची ३ लाख ७० सहस्र रुपयांची फसवणूक केली आहे. खारघर पोलिसांनी यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. वहीद सियतअली शेख आणि वसीम वहीद शेख अशी आरोपींची नावे आहेत. शेख यांनी शिक्षक आफाक अहमद मुश्ताक अहमद जमादार यांना गाडीवर कुठल्याही अधिकोषाचे कर्ज नसल्याची खोटी कागदपत्रे दाखवून ती विकली होती. काही दिवसांनी या गाडीवर आय.डी.एफ्.सी. फर्स्ट बँकेचे कर्ज असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर जमादार यांनी खारघर पोलीस स्थानकात तक्रार केली.