मुंबई, ७ जुलै (वार्ता.) – महाराष्ट्रात सर्वाधिक संख्येने कोरोना संसर्ग असलेले रुग्ण आहेत. आता ‘डेल्टा प्लस’ आणि ‘म्युकरमायकोसीस’चे रुग्ण महाराष्ट्रात सापडत आहेत. राज्याने आजपर्यंत ३ कोटी ४३ लाख इतके लसीकरण केले असून देशात ही संख्या सर्वाधिक आहे. प्रतिदिन लसीकरण करण्याची राज्याची किमान संख्या १० लाख असून कमाल संख्या १५ लाख आहे. लसीकरणामुळे सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होते. त्यामुळे ७० टक्क्यांपर्यंत लसीकरण होणे अत्यावश्यक आहे. तरी केंद्राकडून प्रत्येक मासाला ३ कोटी कोरोना प्रतिबंधक लसी मिळाव्यात, असा ठराव आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेत मांडला. त्याला विरोधी पक्षनेत्यांसह सर्वांची संमती मिळाली.
लसीकरणाच्या संदर्भात राजेश टोपे म्हणाले की,
१. लसीकरणात लस वाया जाण्याचे प्रमाण राज्यात सर्वाधित अल्प म्हणजे १ टक्क्यांपेक्षाही अल्प आहे.
bयापुढील काळात सर्वांसाठी लसीकरण करण्यात येणार असून अगदी ओळखपत्र नसलेल्यांनाही लसीकरण करण्यात येणार आहे. जे अगदी झोपून आहेत ज्यांना घराबाहेर जाणे अशक्य आहे, अशांचेही विविध पर्याय काढून लसीकरण करण्यात येणार आहे.
३. येत्या २-३ मासांत राज्यातील सर्व लसीकरण पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.