लोकप्रतिनिधींना या संदर्भात काय वाटते ?
भंडारा – खरीप हंगामातील लाभांशाचे (बोनस) पैसे मिळावे, या मागणीसाठी विधान परिषदेचे आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली ३ जुलै या दिवशी येथील जिल्हा पणन अधिकारी यांच्या कार्यालयावर ‘ताला ठोको आंदोलन’ करण्यात आले. जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश लागू असतांना या आंदोलनाला मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते. या वेळी आंदोलकांनी कोरोनाचे नियम पायदळी तुडवले, तसेच या आंदोलनासाठी प्रत्येकी १५० रुपये मजुरीवर आणण्यात आले आहे, असा आरोप आंदोलन महिलांनी केला.