नांदेड येथे १ सहस्र ५०० रुपयांची लाच स्वीकारणार्‍या मुख्याध्यापकाला अटक !

भ्रष्टाचाराने पोखरलेल्या शिक्षण संस्था !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

नांदेड, २ जुलै (वार्ता.) – कंत्राटी मजुरीचे ४ मासांचे थकित देयक सिद्ध करून ते संमत करून आणण्यासाठी नामदेव कैलवाड (वय ५६ वर्षे) यांनी तक्रारदाराकडून १ सहस्र ५०० रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३० जून या दिवशी अटक केली. कैलवाड हे शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा सहस्रकुंड येथे मुख्याध्यापक आहेत. या प्रकरणी २९ जून या दिवशी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती.