असे केले, तर केरळमध्ये मल्ल्याळम् भाषा सोडून इतर भाषांत बोलायला बंदी केली, तर चालेल का ?

(प्रतिकात्मक छायाचित्र)

​‘नवी देहली येथील गोविंद बल्लभ पंत रुग्णालयाने परिचारिकांनी कामाच्या वेळी मल्ल्याळम् भाषेचा वापर न करण्याचा काढलेला आदेश विरोधामुळे रहित करण्यात आला आहे. ‘हिंदी आणि इंग्रजी भाषा यांचाच संवादासाठी वापर करण्यात यावा’, असे आदेशात म्हटले होते. याचे पालन न करणार्‍यांवर कारवाई करण्याची चेतावणी देण्यात आली होती.’