‘विदेशी जंक फुड : पोषण या आर्थिक शोषण ?’ या विषयावर आज विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !

सध्याच्या व्यस्त दिनचर्येमध्ये अनेक जण खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतात, त्यातच भूक तात्पुरती शमवण्यासाठी ‘जंक फूड’ला प्राधान्य देतात; मात्र ‘जंक फूड’ शरीरासाठी हानीकारक आहे, तसेच यामाध्यमातून आर्थिक शोषण कसे होते, हे सर्वांच्या लक्षात यावे यासाठी १ जुलै या दिवशी असलेल्या ‘राष्ट्रीय चिकित्सक दिना’निमित्त आरोग्य साहाय्य समिती आणि सुराज्य अभियान यांच्या वतीने ‘सुराज्य की ओर’ या मालिकेच्या अंतर्गत ३० जून या दिवशी विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

वेळ : सायंकाळी ७ वाजता

वक्ते

  • वैद्य सुविनय दामले, राष्ट्रीय गुरु, आयुष मंत्रालय
  • श्रीमती मीनाक्षी शरण, खाद्य आणि पोषण विशेषज्ञ
  • श्री. इंद्रसेन सिंह, संघटन मंत्री, भूतपूर्व सैनिक कल्याण संघटन, उत्तरप्रदेश
  • अश्विनी कुलकर्णी, समन्वयक, आरोग्य साहाय्य समिती

लाईव्ह पहाण्यासाठी भेट द्या !

https://hindujagruti.org

https://youtube.com/HinduJagruti

https://twitter.com/HinduJagrutiOrg