जम्मूमधील सैन्यदलाच्या तळावर ड्रोन्सद्वारे आक्रमणाचा प्रयत्न सैनिकांनी उधळला !

  • जिहादी आतंकवाद्यांकडून आता सर्रासपणे होत असलेल्या ड्रोन्सचा वापर पहाता भारताला यावर तातडीने सतर्क होऊन आतंकवाद्यांची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत !
  • काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मुळापासून नष्ट न केल्याने आता ही स्थिती निर्माण झाली आहे. उद्या जिहादी आतंकवादी भारतातील अन्य शहरांतील महत्त्वाच्या ठिकाणांवर आक्रमण करू लागण्यापूर्वी त्यांचा कायमचा बंदोबस्त करा !

जम्मू – जिहादी आतंकवाद्यांनी येथील वायूदलाच्या तळावर ड्रोनद्वारे बॉम्बस्फोट केल्यानंतर अवघ्या २४ घंट्यांत आतंकवाद्यांनी जम्मूच्याच कालूचक येथील सैन्यदलाच्या तळावर ड्रोनद्वारे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या वेळी सतर्क असणार्‍या येथील सैनिकांनी मात्र ड्रोनवर गोळीबार केल्यावर दोन्ही ड्रोन दिसेनासे झाले. २७ जूनच्या उत्तररात्री ३ च्या सुमारास २ ड्रोन तळाजवळ घिरट्या घालत असतांना सैनिकांना ते दिसल्यावर त्यांनी त्वरित गोळीबार चालू केला. सध्या सैन्याकडून या ड्रोन्सचा शोध घेण्यात येत आहे.