वलसाड (गुजरात) येथे कसायांनी गोरक्षकाला वाहनाखाली चिरडून ठार मारले !

१० जणांना अटक

गोरक्षकांना चिरडून ठार मारण्याचे धाडस कसायांमध्ये आणि गोतस्करांमध्ये येतेच कसे ? दोषी कसायांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी गुजरात सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, अशीच हिंदूंची आणि गोभक्तांची अपेक्षा आहे !

प्रतिकात्मक छायाचित्र

वलसाड (गुजरात) – येथे अवैधरित्या गोवंशांची वाहतूक करणार्‍या एका टेम्पोतील कसायांनी हार्दिक कंसारा या २९ वर्षीय गोरक्षकाला धर्मपूर-वलसाड मार्गावर वाहनाखाली चिरडून ठार मारले. या प्रकरणी पोलिसांनी १० जणांना अटक केली आहे. हार्दिक कंसारा गोतस्करी रोखण्याचा प्रयत्न करत असतांना त्यांना ठार करण्यात आले. (गोरक्षकाला जी माहिती मिळते आणि तो गोतस्करी रोखण्याचा प्रयत्न करतो, तशी माहिती सर्व यंत्रणा हाताशी असतांना पोलिसांना आणि गुप्तचर यंत्रणांना का मिळत नाही ? गुजरातमध्ये गोहत्याबंदी कायदा असतांना गोतस्करी होतेच कशी ? कि कायदे केवळ कागदावर संमत करण्यासाठीच असतात ? या निष्क्रीयतेला उत्तरदायी असणार्‍या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक)  घटनेनंतर टेम्पोचालक पसार झाला. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी या टेम्पोमधून ११ गोवंश जप्त केले. सर्व आरोपी एका आंतरराज्य टोळीचे सदस्य आहेत. (असे असेल, तर गुजरात पोलिसांप्रमाणे महाराष्ट्रातील पोलीसही झोपा काढत आहेत, हेच स्पष्ट होते ! – संपादक) वलसाडच्या गावातून अवैधरित्या गोवंश खरेदी करून महाराष्ट्रातील नाशिक, नगर आणि भिवंडी येथे त्यांची विक्री केली जाते. (या टोळीप्रमाणे आणखी किती टोळ्या गुजरात आणि देशाच्या अन्य राज्यांत असतील, याची कल्पनाच करता येत नाही. केवळ कायदे करून गोहत्या थांबणार नाही, हे अनेक घटनांतून स्पष्ट झालेले असल्याने आता गोहत्या कायमस्वरूपी रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हाच एकमेव पर्याय आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक)