सातारा जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले म्युकरमायकोसिसचे १० रुग्ण !

म्युकरमायकोसिसचे रुग्ण

सातारा, १७ जून (वार्ता.) – सातारा जिल्ह्यात १६ जून या एकाच दिवशी म्युकरमायकोसिसचे १० रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसमुळे १९ जणांचा मृत्यू झाला असून ३७ रुग्ण बरे झाले आहेत. मृत्यूदर ३७ टक्के असून प्रशासनाला कोरोना रुग्ण आणि म्युकरमायकोसिसचे रुग्ण यांच्यावर उपचार करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. म्युकरमायकोसिससाठी आवश्यक उपचार सातारा जिल्हा रुग्णालय, जम्बो रुग्णालय आणि जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालयात चालू आहेत. तसेच जिल्ह्यामध्ये म्युकरमायकोसिससाठी आवश्यक गोळ्या आणि इंजेक्शन यांचा तुटवडा आहे. मध्यंतरी महाबळेश्‍वरमध्ये म्युकरमायकोसिससाठी आवश्यक इंजेक्शनचा काळाबाजार झाल्याच्याही घटना समोर आल्या होत्या.