रेल्वेतून प्रवास करतांना ‘कोरोना लस घेतल्याचे प्रमाणपत्र’ दाखवण्याचा नियम होण्याची शक्यता !

जमशेदपूर (झारखंड) – रेल्वेतून प्रवास करणार्‍या नागरिकांना आता ‘आर्टी-पीसीआर्’ चाचणीचा अहवाल दाखवण्याऐवजी ‘कोरोना प्रतिबंधात्मक लस’ घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा प्रकारचा नियम करण्याचा रेल्वेकडून विचार चालू आहे. देशातील काही राज्य सरकारांनी अशा प्रकारचा नियम करण्याविषयी रेल्वे मंत्रालयाला सूचना केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीयमंत्री हरदीप सिंह पुरी यांनीही आर्टी-पीसीआर् चाचणी अहवालाऐवजी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना विमानांतून प्रवास करू देण्याचा नियम करण्याविषयी निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती दिली होती.