मुसलमान लोक कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यास टाळाटाळ करतात ! – उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत

ऋषिकेश (उत्तरप्रदेश) – मी जाणीवपूर्वक नाव घेत आहे की, देशातील मुसलमान लोक सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणापासून दूर रहात आहेत. त्यांच्या मनामध्ये अजूनही शंका आहे. ते अजूनही घाबरत आहेत. त्यांच्यात लसीकरणाविषयी अपसमज आहेत, असे विधान उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते त्रिवेंद्रसिंह रावत यांनी  केले. ते येथे ‘जागतिक रक्तदान दिना’निमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. रावत यांनी या वेळी ‘सामाजिक संस्था आणि प्रसारमाध्यमे यांनी मुसलमानांमध्ये जनजागृती करून ‘लसीकरण हे धोकादायक नाही’, असा संदेश देण्यात साहाय्य करावे’,  असे आवाहनही केले.

रावत पुढे म्हणाले की, पाकिस्तान सरकारने दूरभाष यंत्रणा बंद करणे, वेतन रोखून धरणे यांसारख्या कठोर उपाययोजनांच्या माध्यमांतून लसीकरणासाठी नागरिकांना भाग पाडले आहे. अशा निर्णयांमुळे लसीकरणाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती निर्माण करता येते.