बांदा येथे परप्रांतीय कामगाराच्या मृत्यूच्या प्रकरणी कल्याण येथून एकाला अटक

बांदा – मूळचा बंगाल येथील असलेला विश्‍वजित कालिपत मंडल या परप्रांतीय कामगाराचा मृतदेह ५ जून या दिवशी तो रहात असलेल्या शहरातील गडगेवाडी परिसरातील घरात आढळला होता. त्याच्या अंगावर असलेल्या तीक्ष्ण हत्याराच्या घावामुळे त्याची हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी उल्हासनगर, कल्याण येथून सुखदेव बारीक या संशयिताला अटक केली. मंडल याची हत्या करून बारीक हा कल्याण येथे पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.