धर्मादाय आयुक्तांची सर्व न्यास आणि संस्था यांनी नामफलक मराठी भाषेत लावण्याची सूचना

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – सर्व न्यास आणि संस्था यांनी त्यांच्या नावाचे फलक मराठी भाषेत लावणे आवश्यक असल्याचे परिपत्रक धर्मादाय आयुक्त, मुंबई यांनी काढले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नोंदणीकृत असलेले सर्व न्यास आणि संस्था यांनी त्यांच्या नावाचे फलक मराठी भाषेत अन् दर्शनी भागात लावावेत, असे आवाहन साहाय्यक धर्मादाय आयुक्त, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.